बस चालकास मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक
(प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील बस स्टॅण्ड येथुन औरंगाबाद ते शिर्डी बस क्र एम एच ४० एन ८८९० हीस घेवुन जाणारे चालकास कट मारल्याच्या कारणावरून बस स्टँडमध्ये येवून चालकास मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीरामपुर शहरातील बस स्टँण्ड येथुन औरंगाबाद ते शिर्डी बस क्र एम एच ४० एन ८८९० हीस घेवुन जाणारे चालक दिपक बाळासाहेब आव्हाड हे शासकिय काम करत असताना त्यांना रिक्षा क्र एम एच १७ व्ही ७८१७ मध्ये आलेले रविंद्र कंलगे व सागर जोधंळे यांनी श्रीरामपूर बसस्टॅण्ड येथे अडवुन चालकास खाली उतरुन घेत वाईट वाईट शिविगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर हर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत असतना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाल्याने यातील रविंद्र कलगे व सागर जोधळे या आरोपींना लागलीच श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलिस चालक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सांगळे तसेच अपर गौरव दुर्गुळे, पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अधीक्ष कार्यालयाकडील पोलीस नाईक. फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी केली असून, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे हे करीत आहेत.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें