संदेश

फ़रवरी, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं

चित्र
  Jai Jai Maharashtra Maza will be state song : मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. Maharashtra State Official Song : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या गीताला राज्यगीताचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात येणार आहे . त्यामुळं राज्य सरकारच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये हे गीत वाजवले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याआधीच या संदर्भात संकेत दिले होते. काही महिन्यांपूर्वी याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकही झाली होती. राज्यगीत म्हणून निवडीसाठी अनेक गीतं सर...

कचनेर येथील चोरी झालेल्या सोन्याची मुर्तीचे तुकडे मा. के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचे हस्ते परत

चित्र
 पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगबाद ग्रामीण प्रेस नोट दिनांक 11/2/23 कचनेर येथील चोरी झालेल्या पार्श्वनाथ भगवंताची मुर्तीच्या सोन्याचे तुकडे ज्यांची किंमत 94,87,797,/- रुपयांचे कचनेर संस्थानास मा. के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, यांचे हस्ते परत … संस्थानच्या पदाधिकारी यांनी मानले पोलीसांचे आभार …. दिनांक 25/12/2022 रोजी विनोद रुपचंद लोहाडे रा. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे फिर्याद दिली कि, दिनांक 8/12/22 ते 23/12/2022 यादरम्यान श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिराचे गाभा-यातील पार्श्वनाथ भगवंताची 1,05,00,000 /- (एक कोटी पाच लाख रूपये) किंमतीची 02 किलो 56 ग्रॅम वजनाची सुवर्ण धातूची मुर्ती अज्ञात चोरटयांनी चोरून नेली म्हणुन कलम 380 भादंवी प्रमाणे पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयांचे अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद व मा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली या संवेदनशील गुन्हयांचा अत्यंत सचोटीने तपास करून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधार...

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स, असे करा Download..

 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स, असे करा Download.. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 10वीची परीक्षा  देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची परीक्षा ही दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार आज दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत.    www.mahahsscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे स...

पाणी पुरवठा सूचना श्रीरामपूर

पाणी पुरवठा सूचना ९/२/२०२३ ते ११/२/२०२३ श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना या निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की, जलशुद्धीकरण केंद्र येथील अत्यावश्यक तांत्रिक दुरुस्तीसाठी जलशुद्धीकरण केंद्र  _किमान तीन दिवस बंद_ ठेवणे अनिवार्य असल्यामुळे तसेच शहरातील विविध भागात असणाऱ्या जलकुंभांच्या साफसफाई साठी _ गुरूवार दिनांक ९/२/२०२३ पासून शनिवार दिनांक ११/२/२०२३_ पर्यंत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केले जाणार असून काम लवकर पूर्ण झाल्यास तातडीने पाणीपुरवठा नियमितपणे सुरु करण्यात येईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच, घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरून सहकार्य करावे असे आवाहन   प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे. जल है तो कल है

चंद्ररूप डाकले महाविद्यालयात पारितोषिक वितरण

चित्र
चंद्ररूप डाकले महाविद्यालयात पारितोषिक वितरण श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्ररूप जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेज विभागातर्फे सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या टॅली परीक्षा, रंगभरण स्पर्धा व कृतज्ञता सप्ताह विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या विविध स्पर्धेचे प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. प्रसिद्ध वकील भाऊसाहेब औताडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. मुजीब शेख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागतप्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. यावेळी टॅली कोर्सचे प्रशिक्षक प्रा. दिनेश चोरडिया व रंगभरण स्पर्धा आयोजन समन्वयक श्रीमती कलावती देशमुख तसेच अनेक पालक, महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती जयश्री मतें यांनी केले. प्रा. विजय जोशी यांनी आभार मानले. Subcribe to ahmednagar news 

बस चालकास मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

 (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील बस स्टॅण्ड येथुन औरंगाबाद ते शिर्डी बस क्र एम एच ४० एन ८८९० हीस घेवुन जाणारे चालकास कट मारल्याच्या कारणावरून बस स्टँडमध्ये येवून चालकास मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्रीरामपुर शहरातील बस स्टँण्ड येथुन औरंगाबाद ते शिर्डी बस क्र एम एच ४० एन ८८९० हीस घेवुन जाणारे चालक दिपक बाळासाहेब आव्हाड हे शासकिय काम करत असताना त्यांना रिक्षा क्र एम एच १७ व्ही ७८१७ मध्ये आलेले रविंद्र कंलगे व सागर जोधंळे यांनी श्रीरामपूर बसस्टॅण्ड येथे अडवुन चालकास खाली उतरुन घेत वाईट वाईट शिविगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर हर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत असतना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाल्याने यातील रविंद्र कलगे व सागर जोधळे या आरोपींना लागलीच श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेव...

शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांमुळे श्रीरामपुरात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या लव जिहादीविरोधात गुन्हा दाखल...

चित्र
शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांमुळे श्रीरामपुरात विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्या लव जिहादीविरोधात गुन्हा दाखल... श्रीरामपूर - शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 117/ 2023 हा विनयभंग व पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.यातील आरोपी फारुक हा शहरातील वार्ड नंबर ०२ भागातील नवी दिल्ली परिसरात राहतो. प्रकरणी अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील एका ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला काल दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी व त्यापूर्वी देखील शहरात सायकल वरून जात असताना हात ओढून,लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपी फारूक याने केले. या घडलेल्या विनयभंगाच्या प्रकारामुळे अल्पवयीन पीडित मुलगी व तिचे आई-वडील हे अतिशय भयभीत झालेले होते.या वेळी लव्ह जिहादचा गंभीर विषय म्हणून "शिवप्रहार प्रतिष्ठान"च्या मावळ्यांनी त्यांना आधार देऊन हिंमत दिली व या संकटात "शिवप्रहार" तुमच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे सांगितले आणि त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठ...