पाणी पुरवठा सूचना श्रीरामपूर
पाणी पुरवठा सूचना ९/२/२०२३ ते ११/२/२०२३
श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना या निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते की, जलशुद्धीकरण केंद्र येथील अत्यावश्यक तांत्रिक दुरुस्तीसाठी जलशुद्धीकरण केंद्र _किमान तीन दिवस बंद_ ठेवणे अनिवार्य असल्यामुळे तसेच शहरातील विविध भागात असणाऱ्या जलकुंभांच्या साफसफाई साठी _गुरूवार दिनांक ९/२/२०२३ पासून शनिवार दिनांक ११/२/२०२३_ पर्यंत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केले जाणार असून काम लवकर पूर्ण झाल्यास तातडीने पाणीपुरवठा नियमितपणे सुरु करण्यात येईल.
तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच,
घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरून सहकार्य करावे असे आवाहन
प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें