चंद्ररूप डाकले महाविद्यालयात पारितोषिक वितरण
चंद्ररूप डाकले महाविद्यालयात पारितोषिक वितरण
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या येथील चंद्ररूप जैन कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेज विभागातर्फे सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या टॅली परीक्षा, रंगभरण स्पर्धा व कृतज्ञता सप्ताह विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या विविध स्पर्धेचे प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. प्रसिद्ध वकील भाऊसाहेब औताडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. मुजीब शेख यांनी केले. पाहुण्यांचे स्वागतप्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. यावेळी टॅली कोर्सचे प्रशिक्षक प्रा. दिनेश चोरडिया व रंगभरण स्पर्धा आयोजन समन्वयक श्रीमती कलावती देशमुख तसेच अनेक पालक, महाविद्यालयाचे सहकारी प्राध्यापक विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती जयश्री मतें यांनी केले. प्रा. विजय जोशी यांनी आभार मानले.
Subcribe to ahmednagar news

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें